Photography In Marathi 


नमस्कार मित्रानो,
मी, सनी वि. चौधरी.

     आपण मागील भागात पहिले कि जर आपल्याला जर Professionally फोटोग्राफी या क्षेत्रात यायचे असेल आणि या क्षेत्रांत पैसे कमवायचे असतील तर आपण एक DSLR कॅमेरा घेतला पहिजे. ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा घेतला असेल किवा घेणार असाल तर, एक प्रश्न नक्की तुम्हाला येणार तो म्हणजे आपण Full Frame Camera घ्यायचा कि Crop Frame किवा, APSC Camera / DX Format Camera हेही काही शब्द तुम्ही ऐकलेले असतील. मग नक्की यामध्ये फरक काय असतो? कोणत्या कॅमेराचा वापर कोणत्या कामासाठी करु शकतो. हे पण खूप महत्वाचे आहे. आपल्या फोटोमध्ये याचा काही फरक पडतो का? या सर्व प्रश्नाचा विचार आपण आज या भागामध्ये करू. Full Frame Camera/ Crop Frame Camera त्याचे वापर, त्याचे फायदे नुसकान ई. सर्व गोष्टी मधला फरक आपण बघणार आहोत.

सर्व प्रथम आपण Full Frame Camera चे फायदे-नुसकान व उपयोग बघूया.

  • Full Frame Camera
१) आपण FX-format कॅमरा आणि DX-format कॅमेरा हे शब्द ऐकले असतील त्यामधला Fx Format कॅमरा म्हणजेच Full Frame Camera असतो. ज्याला canon मध्ये Full Frame म्हणतात व nikon मध्ये FX format कॅमेरा असे म्हणतात.

२) Full Frame कॅमेरा व Crop Frame कॅमेरा मधील सर्वत मोठा व महत्वाचा फरक म्हणजे दोन्ही कॅमेराची Sensor size. full frame कॅमेरामध्ये 36x24mm हि Sensor size असलेला Sensor बसविलेला असतो. याची size हि crop sensor sensor पेक्षा दीड पटीने मोठी असते. 36x24 हिच size का घेतली हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कॅमेराचा ईतिहास माहित असला पहिजे. या भागात आपण ते सर्व नाही बघणार ये. ज्यांना इतिहास पाहिजे त्यांनी comment box मध्ये सांगा.

३) कोणतीही कंपनी ज्यावेळेस कॅमरासाठी Lens बनविते त्यावेळेस Full Frame कॅमेराना विचारात घेऊन बनवत असते. त्यामुळे जेव्हा आपण full frame कॅमेरा वर कोणतही lens लावतो. त्यावेळेस आपण जी focal lenth असलेली lens लावत आहोत, तेवढाच angle of view आपल्याला भेटतो. उदा. 35mm वर 35mm चा Angle of view भेटतो, 50mm वर 50mm चा तर 100mm वर 100mm चा Angle of view भेटतो.

फरक बघताना जर full frame चा पहिला मुद्दा व crop frame चा पहिला मुद्दा असा बघितला तर लवकर समजेल.      


४) या कॅमेराची Sensor size मोठी असल्यामुळे Crope Sensor कॅमेराच्या तुलनेत यामध्ये Pixel जास्त भेटतात. ज्यामुळे आपल्यला जर एकदा फोटो crop करण्याची गरज पडली तर जास्त pixel असल्यामुळे फोटो बऱ्यापैकी crop करता येतो.

५) या कॅमेरा मधील ISO sensitivity चागली असल्यामुळे ज्या ठिकाणी उपलब्ध लाईट कमी आहे किवा रात्रीच्या वेळी फोटो काढताना iso जास्त वाढवल्यास Grains येत नाहीत. त्यामुळे फोटो खराब होण्याची शक्यता कमी असते.


६) Crop Frame कॅमेराच्या तुलनेत Full Frame कॅमेरामध्ये  Frames per second म्हणजेच FPS हे जास्त भेटतात. ज्याचा चागला वापर हा आपण High speed photography साठी करू शकतो.


७) या कॅमेराचा वापर हा जास्तीत जास्त प्रोफेशनल कामासठी केला जातो. landsacp photographers, Nathure photographer, Widelife photographer, Architecture photographer याचा वापर करतात कारण त्यांना wide angle of view हवा असतो.  


8) या कॅमेरेचा उपयोग जितका चागला आहे तितकेच हे कॅमेरे खूप महाग असतात त्यामुळे सर्वन घेणे शक्य नसते. 


९) या कॅमेरावर Crop Frame कॅमेरा Lens बसवू शकत नाही. या कॅमेराचे lens हि तितकेच महाग असतात.

१०) हे कॅमेरे हे Size ने मोठे असतात. व वजनाने Crop Sensor कॅमेरा पेक्षा जास्त असतात. mirrorless वगळता.




  • Crop Frame Camera (APSC/DX-Format Camera)


१) APSC/DX-format कॅमेरे म्हणजेच Crop Frame कॅमेरे असतात. Canon मध्ये यांना APSC कॅमेरे तर Nikon मध्ये DX format चे कॅमेरे म्हटले जाते.

२) नावा प्रमाणेच Crop Frame कॅमेरा म्हणजेच वर सागीतल्या प्रमाणे याची sensor size हि दीड पटीने लहान असते. 24x15 ईतकी या कॅमेराची sensor size असते.


३) कोणतीही कंपनी Lens बनवतानी जरी Full Frame कॅमेराना विचारात घेऊन बनवत असली तरी Full Frame च्या सर्व lens आपण Crop Frame वर वापरू शकतो. 


४) Sensor size मध्ये असलेल्या फरकामुळे आपन या कॅमेरा वर लावलेल्या lens च्या Angle of view मध्ये हि दीड पटीचा फरक पडतो. हा फरक canon कॅमेरामध्ये हा फरक 1.6 तर Nikon मध्ये 1.5 इतका असतो. 

उदा. जर आपण Canon कॅमेरा वर 35mm focal lenth असलेली lens लावली तर त्याचा angle of view 35x1.6=56mm तर nikon camera मध्ये 35x1.5=52.5 ईतका मिळतो. अर्थात Frame हि लहान भेटते.

५) Sensor size मधल्या या फरकाचा फायदा widelife photographers ला जास्त होतो. कारण जर तर 600mm Focal lenth ची lens वापरत असतील तर त्यांना Crop Frame वर canon मध्ये 600x1.6 = 900mm ची Focal Lenth मिळते.


६) Crop frame कॅमेरामध्ये sensor लहान असल्याने Pixel size देखील कमी असते. परंतु लहान वाटत असली तरी खूप लहान नक्कीच नाही. या फोटोच्या देखील आपण मोठ्या प्रिंट घेऊ शकतो.


७)  या कॅमेराची ISO sensitivity तुलनेने इतकी चागली नसते. त्यामुळे या कॅमेरामध्ये iso वाढवताना योग्य काळजी घ्यावी Grains येण्याची शक्यता जास्त असते. किवा ज्याठिकाणी चागला light आहे, अश्या ठिकाणी याचा वापर करावा.


८) या कॅमेराचा वापर आपण सर्व फोटोग्राफी करण्यासठी करू शकतो. wedding, event, व ईतर सर्व कामासाठी याचा चागला वापर करता येतो. 

९) या कॅमेराची किमत सर्वसाधारण आपल्याला परवडेल ईतकी असते, त्यामुळे आपण हे कॅमेरा सहज घेऊ शकतो. व या कॅमेरा वर Full Frame च्या सर्व Lens आपल्याला वापरता येतात. 

१०) हे कॅमेरे तुलनेने लहान असतात. व वजनाने देखील हलके असतात. त्यामुळे जास्त वेळ केमेरा हातात घेऊन आपल्याला काम करायचे असल्यास ते शक्य होते. 

११) माझ्या मते तरी आधी आपण crop frame कॅमेरा घेऊन सर्व गोष्टीची माहिती करून घेतली पाहिजे. कॅमेरा शिकून घेतला पाहिजे आणि नंतर गरज पडल्यास आपण Full Frame घेऊ शकतो.


https://www.passtechusa.com/nixuwjutp?key=2aa2802aa2be33f27a6f2ff073d55aaa
open image

                                                     Photography in Marathi.

 जर आपण एकाठिकाणी उभे राहून जर एकाच focal lenth वर दोन्ही कॅमेरांनी फोटो घेतले तर फरक समजून याईल. 
वरील फोटो वरून आपण sensor size चा फरक समजून घेऊ शकतो. लाल कलरचा चौाकोन full frame चा sensor आहे असे आपण समजले आणि निळा चौकोन crop frame कॅमेराचा तर लाल चौकोनातील angle of view हा नक्कीच मोठा आहे. त्यामुळे जसे तुमचे काम असेल त्यानुसार कॅमरा घ्या. वर दिलेल्या माहिती मध्ये काही चुकले असेल किवा राहिले असेल तर नक्की काळवा.



अधिक माहिती साठी संपर्क साधा.
Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com
Instagram:- https://www.instagram.com/pixel_movement/