Photography In Marathi 


नमस्कार मित्रानो,
मी, सनी वि. चौधरी.

     आपण सुरु केलेले मराठीमधून फोटोग्राफी चे blogs आज पासून काही तांत्रिक कारणास्तव आपण बंद करत आहोत. परंतु आपण bloging पूर्ण पणे बंद नाही करत आहोत. त्याएवजी मी काही फोटोविषयी माहिती देण्याचा पर्यंत करणार आहे. मी काढले काही फोटो या ठिकाणी टाकणार आहे, आणि त्या सोबत त्यासाठी मी काय settings वापरले व का ? हे आपण बघणार आहोत. या बद्दल तुमचे मत हि तुम्ही सांगू शकतात.


     आज आपण सुरवातीला Low Light Photography बद्दल बोलूया.. त्यासाठीचा पहिला फोटो मी खाली टाकत आहे. 👇👇👇


Low Light Photography Or Light Trials

light trails photographer

lighr trils, long exposer, nashik images, potogrpahy in marathi


☝☝☝ वरील फोटोहा नाशिकच्या उड्डाणपूला खालील आहे. हा फोटो घेण्यासाठी मी माझा कॅमेरा हा रस्त्याच्या मध्यभागी दिसत असलेल्या लोखंडी रिलिंग वर Tripoad वर लावलेला आहे, आणि कॅमेराची फ्रेम अशी सेट (Compose) केली कि ज्यामध्ये असंख्य लाईन्स म्हणजेच दृश किवा अदृश रेषा या वेगवेगळा ठिकाणहून सुरु होऊन एकाच ठिकाणी एकाच बिंदू वर एकत्र येतील. या Composition ला Leading lines composition असे म्हणतात. 

     वरील फोटोमध्ये जर बघितले तर पुलाच्या खली जे Support देण्यासाठी लावलेले आहे ते व पुलाचा महत्वाचा वरचा भाग हा फ्रेमच्या वरील भागात सुरु होऊन मध्य बिंदू पर्यंत जात आहे. त्यानंतर ज्या रिलिंग वर मी माझा कॅमेरा लावलेला आहे तेही फ्रेमच्या एका ठिकाणहून सुरु होतात.रस्यावर आखली जाणारी पांढरी रेषा जी फ्रेमच्या खलील भागातून जात असली तरी खूप महत्वाची आहे. जिच्या मुळे आपले लक्ष हे रस्त्यावरील बारीक Daitils वर जाते. त्यानंतर रस्ताच्या अगदी त्या कडेला असलेले Divider व झाडे हे फ्रेमच्या त्या भागातून सुरु होऊन मध्य भाग वर एकत्र येतात. 
  
  


      मला हवी असलेली फ्रेम set झाल्यावर एकंदरीत त्याठिकाणचा उपलब्द लाईट कमी जास्त होणारा गाड्याचा लाईट सर्व विचार करून व मला हवा असलेल्या फोटोसाठीचे Exposer लावले. मला रात्रीच्या वेळी जास्त iso वाढवायला आवडत नाही. अर्थात grains येतात म्हणून पण साधरण 100 - 800 दरम्यान सहसा grains येत नाही, तरीही मी iso 100 ठेवतो. या फोटोसाठी Apethure F7 ठेवलेले होते. F7 ठेवणे हि माझी चुकीही म्हणता येईल कारण मी अजून F13 ते F20 पर्यंत ठेवले असते तर फोटो हा अजून Sharpe व  Ditails  हि घेता आल्या असत्या. परंतु मी shutter speed हे पूर्ण 4-5 sec ठेवणार होतो. F13 ते F20 पर्यंत ठेवले असता पुला खालील भागामध्ये थोड्या प्रमाणात shadow तयार होत होत्या. म्हणून मी F7 हे Apethure ठेवले. व या ठिकाणावरून वाहने हो अगदी जोरात जात असल्याने माझ्या फ्रेम मध्ये आल्या नंतर 4-5 sec मध्ये वाहने हि त्या शेवटच्या बिंदू पर्यंत पोहचत होती. Apethure वाढवण्यासाठी Shutter speed जास्त ठेवला असता तर गाड्याच्या पुढच्या light मुळे फोटो over expose होण्याची शक्यता होती. म्हणून मी या फोटोसाठी 4 पूर्ण सेकंद shutter speed ठेवले. म्हणजे माझा या फोटोसाठीचा Exposure Triangle झाला.

ISO = 100 

Apethure = F7
Shutter speed = 4" sec 

 अश्या प्रकारचे फोटो घेण्यासाठी तुम्हला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. 


१) जेव्हा तुम्ही कॅमेरामध्ये Shutter Speed हा पूर्ण सेकंद ठेवतात. तेव्हा तुमचा हात इतका स्थिर राहू शकत नाही, म्हणून त्यासाठी एक चागला Tripod असायला हवा. चागला यासाठी कि वाहने ज्या वेगाने अशा ठिकाणावरून जातात तेव्हा खूप वेगाने जातात त्याच्या हवेने तुमचा कॅमेरा हलू शकतो. त्यामुळे फोटो खराब होऊ शकतो. व Tripod पडला तर कॅमेरा हि खराब होऊ शकतो.


२) तुम्ही फोटो काढण्यासाठी Remote Release  चा वापर करू शकतात. ज्याने तुम्हाला कॅमेरा ला हात लावण्याची गरज पडणार नाही. Remote Release नसेल तर तुम्ही कॅमेराचा Self Timer चा वापर करू शकता. जो वापरल्या नंतर कॅमेरा shutter button दाबून झाल्यावर 2 sec नंतर फोटो काढतो. त्यामुळे फोटोमध्ये sheck येण्याची शक्यता कमी होते. 


३) रस्ताच्या कडेला फोटो काढताना योग्य ठिकाणी उभे राहून फोटो काढा. रस्ताच्या मध्य भागी किवा पुला वर फोटो काढायला उभे राहू नका. मी हा फोटो काढण्यासाठी रस्ताच्या बाजूला असलेल्या बगिच्या मध्ये उभा होतो.


४) असे फोटो किवा सर्व फोटो हे RAW मध्ये काढण्याचा पर्यंत करा ज्याने करून नंतर Editing मध्ये चागले

काम करता येते.

५) कोणताही फोटो हा सर्व setting लाऊन एका click मध्ये चागला येतोच असे नाही. खूप सारे फोटो काढल्यानंतर १ - २ फोतो चागले येतात. त्यामुळे त्याचा सराव करत राहिला पाहिजे.


light trails photography

lighr trils, long exposer, nashik images, potogrpahy in marathi



वरील फोटो हा त्याच ठिकाणी रत्याच्या दुसऱ्या बाजूने घेतला गेला आहे.ज्यामध्ये पूल व रस्ता हा पूर्ण दाखवण्याचा पर्यंत केला आहे. तुम्हला हे फोटो व माहिती कशी वाटली अजून असे पोस्ट केले पाहिजे का नक्की सांगा. व तुम्ही हि असे फोटो काढलेले असतील तर खालील नंबर वर पाठवा. व अजून असे फोटो बघण्यासाठी Instagram ला भेट नक्की द्या.




अधिक माहिती साठी संपर्क साधा.
Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com
Instagram:- https://www.instagram.com/pixel_movement/