Photography In Marathi 


नमस्कार मित्रानो,
मी, सनी वि. चौधरी.

     आपण मागील दोन भागात Longexposer photography, Low shutterspeed Photography बघितली, ती कशा प्रकारे केली जाते तेही बघितल. परंतु दर वेळेस आपण रात्रीच्या वेळेलाच फोटो काढणार नाही. किवा कायम low shutter speed तर आपण वापरू शकत नाही. आपल्याला ज्या वेळेस एखादी गोष्ट Motion मध्ये दाखवायची असेल तेव्हा आपण low shutter speed ठेवत असतो. पण जेव्हा आपल्यला एखादी Movement freeze करायची असेल, हलणारा subject देखील स्थिर दाखवायचा असेल तेव्हा आपण High shutter speed ठेवत असतो. आणि हाच आहे आज च्या ब्लोगचा Topic. चला तर मग त्यासाठी आपण High shutter speed वापरून घेतलेले काही फोटो बघूया आणि मग त्या विषयी समजून घेऊ.👇👇👇


Photography In Marathi

     वरील फोटोबघितल्यावर आपल्या लक्षात येईल कि जोरात धावणारा घोडा, किवा  वेगाने चालणाऱ्या गाड्या यांचे आपण जेव्हा फोटो घेत असतो, तेव्हा आपला subject हा स्थिर नसतो. ते वेगाने एका ठिकाणावरून निघून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. अशा वेळेस काही गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. जसे कि आपला subject हा किती वेळ आपल्या कॅमेराच्या फ्रेममध्ये असणार आहे, किवा किती वेगाने तो जात आहे. हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. अशा वेळे आपण आपल्या कॅमेरा मध्ये आपली shutter speed हि 1/500, 1/1000, 1/2000, 1/4000 अशी किवा यापेक्षा जास्त ठेऊ शकत असाल तर ठेवली पाहिजे. या फोटो साठी माझ्या कॅमेराची shutter speed हि 1/400 ठेवली होती. या ठिकाणी हे घोडे चढ असल्यामुळे थोडे हळू होत होते. ज्याने करून 1/400 shutter speed वरही या फोटो मधील subject हे अतिशय शार्प आलेले आहे. मग फक्त shutter speed जास्त ठेऊन आपल्यला सर्व फोटो हे शार्प भेटील का ? 

     तर काही फोटो आपल्यला नक्कीच शार्प भेटील परंतु सर्व फोटो शार्प हवे असतील तर आपल्यला कॅमेराची सर्वात महत्वाची दुसरी setting म्हणजे Aperture देखील जास्त ठेवले पाहिजे. आता या ठिकाणी ज्यांना माहित असेल aperture कशा प्रकारे काम करते किवा DOF काय असते. त्यांना हे समजायला सोपे जाईल. जर आपण aperture हे F1.8 F 2.2 किवा Kit Lens वापरत असाल तर F3.5, F4 अशा प्रकारचे वापरले तर subject चा काही भाग शार्प येऊ शकतो. उदाहरणार्थ जर मी पहिल्या फोटोसाठ F1.8 किवा F4 असे aperture वापरले असते आणि घोड्याच्या तोंडा वर focuse केले असते तर घोड्याचा मागील भाग हा blur आला असता. जास्त शक्यता असते ती म्हणजे subject blur होईल. मग ते होऊ नये म्हणून आपण आपले Aperture हे F8, F11, F16 अशा प्रकारचे ठेवले पाहिजे ज्याने करून जरी focuse हा घोड्यावर किवा माणसा वर झालेला असला. तरी पूर्ण subject हा focuse मध्ये राहील. काही वेळेस तुम्हला Shutter Speed Aperture जास्त ठेवल्याने ISO वाढवावी लागू शकते. 

   
                                                     
     या सर्व महत्वाच्या setting झाल्या नंतर तुम्हला अजून काही setting बदलण्याची गरज पडेल, जसे कि Foceing Mode हा Continuous focuse म्हणजे Canon मध्ये AI Servo व Nikon मध्ये AF-C ठेवला पाहिजे.ज्यामुळे आपला subject हालत जरी असला तरी हि कॅमेरा हा Continuous subject ला focuse करत असतो. व सर्व Focuse Point हे Active ठेवले पाहिजे. ज्यामुळे subject फ्रेम मध्ये कुठेही असला तरी देखील शार्प येतो. व कॅमेरा Single Shooting mode वरून High Speed Shooting Mode वर टाकला पाहिजे. ज्याने करून एकदा shutter button दाबून ठेवल्यावर कॅमेरा 7-8 फोटो काढतो. या ठिकाणी Mirrorless व Full Frame कॅमेराचा फायदा जास्त होतो कारण त्यामध्ये FPS जास्त असतात. आता ज्यांना हे सर्व setting माहित नाही त्यांनी सर्वप्रथम कॅमेरा शिकून घेतला पाहिजे. ज्यानेकरून या सर्व setting समजण्यास सोपे होईल. किवा कॅमरा हा shutter priority mode मध्ये टाकून देखील High speed photography करू शकतो. ज्यामध्ये आपण फक्त shutter speed सेट केल्यानंतर बाकीच्या सर्व setting कॅमेरा स्वतः करून घेतो.(ApertureISO फक्त बाकी setting आपल्यला शिकणे गरजेचे आहे.)


१) High-Speed Photography करताना आपण चागल्या lens वापरल्या पाहिजे ज्यामुळे Focuseing Speed चागली भेटते. 

२) शक्य असल्यास Full Frame कॅमेराचा वापर करणे.    
    
३) याचा वापर फक्त Sport photography साठीच नव्हे तर उडणाऱ्या पक्षाचे, धावणाऱ्या प्राण्याचे व जिथे आपला subject हा सतत हलत असेल अशा सर्व ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो.

४) इतरही काही ठिकाणी या setting चा वापर करून आपण चागले फोटो घेऊ शकतो त्याचे फोटो खाली दिलेले आहे.


High-Speed Photography in Marathi.

      

अधिक माहिती साठी संपर्क साधा.

Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com
Instagram:- https://www.instagram.com/pixel_movement/