Panning Photography All Setting In Marathi.

नमस्कर मित्रानो,
मी सनी वि. चौधरी. (नाशिक).

     आज आपण बघणार आहोत, Panning Photography काय असते ? त्यासाठी कोणत्या Setting आपण आपल्या कॅमेरामध्ये लावल्या पाहिजे? याचा वापर आपण कुठे करू शकतो? या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या या भागात मी मला माहिती असलेल्या पद्धतीने देण्याचा पर्यन्त करेल. Panning Photography हा Street Photography मधील खूप चांगला व तितकाच अवघड प्रकार आहे. तरी देखील नक्कीच या पद्धतीचा वापर करून आपण चांगल्याप्रकारे फोटो घेऊ शकतो. आणि तुम्ही देखील घेतलेले फोटो माझा सोबत share करा आपण ते देखील या ठिकाणी टाकुया.


                Panning Photography In Marathi.



                    Nashik che photo vede.


     आपण इतर कोणताही फोटो घेताना, आपला कॅमेरामध्ये Frame सेट करून व Subject वर Focuse Lock करून मग फोटो घेत असतो. त्याठिकाणी आपला Subject हा स्थिर असतो. त्यामुळे आपल्यला कॅमेरामध्ये सर्व Setting करायला व Frame सेट करायला पुरेसा वेळ भेटतो. परंतु ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारची Street Photogrpahy करत असतो, तेव्हा आपला पहिला प्रयत्न असतो कि आपल्या Subject ला माहित नसताना, आपण त्याचे चांगले Candid Photo घेणे. यामध्ये काही वेळेस आपला Subject हा स्थिर असतो, काही वेळेस थोडीफार हालचाल करत असतो, किवा खूप वेगाने हालचाल करीत असतो. आता ज्यावेळेस आपला Subject वेगाने हालचाल करीत असेल व आपल्यला त्याचा स्थिर फोटो घ्यायचा असेल तेव्हा आपण काय करावे हे मागील भागात आपण बघितले आहे. परंतु ज्यावेळेस आपला Subject वेगाने हलतो आहे व आपल्यला Background मधील Motion दाखवायचे आहे, ज्यामुळे Subject किती वेगाने चालला आहे हे समजू शकेल. तेव्हा आपण Panning Photography चा वापर करून ते चांगल्याप्रकारे दाखवू शकतो.


                 Panning Photography In Marathi


               Nashik Che Photo Vede.


     वरील दोन्ही Photo बघितल्यावर आपल्या लक्षात येईल कि हे फोटो रस्तावरील वेगाने जाणाऱ्या गाड्याचे दुसऱ्या बाजूला उभे राहून घेतले गेले आहे. आता आपण बघूया हे फोटो घेण्यासाठी आपण आपण कॅमेरामध्ये कोणत्या Setting लावल्या पाहिजे ज्यामुळे आपला Subject हा पूर्ण शार्प आला पाहिजे व मागील Background हे पूर्ण पणे Motion मध्येच दिसले पाहिजे. तर यासाठी आपण जेवढी शक्य असेल तेवढी Wide Angle lens या प्रकारच्या फोटोसाठी वापरली पाहिजे. ज्यामुळे आपल्याला आपली Frame हि मोठी भेटते ज्यामुळे आपला Subject हा Frame मध्ये कुठे तरी शार्प येतो. आधी आपण बघितले कि जर Subject ची हालचाल जोरात असेल तर आपण Shutter Speed जास्त ठेवतो. परंतु या ठिकाणी आपल्यला Background मध्ये Motion दाखवायचे असल्यामुळे आपल्याला Shutter Speed हि कमी ठेवावी लागते. जास्तीत जास्त 1/30 च्या पुढे व 1/60 , 1/70 ईतकी पुरशी असते.तुमची Shutter Speed जितकी कमी असेल तेव्हढा Motion blur जास्त भेटेल. Shutter Speed कमी असल्याने कॅमेरामध्ये Sheck येऊ शकतो. व फोटो OverExpose देखील होऊ शकतो. कॅमेरामध्ये Sheck येऊ नये म्हणून आपण IS किवा VC चालू करून घेणे. व हे फोटो थोडे सकाळच्या वेळेस किवा सायंकाळच्या वेळेस काढणे. ज्यामुळे फोटो OverExpose होणार नाही. दुपारी काढायचेच असतील तर Aperture जास्त ठेवावे लागेल. ज्यामुळे DOF मध्ये फकर पडू शकतो. किवा आपल्यला हवी ती DOF भेटणार नाही. हे दोन्ही फोटो हे सायंकाळी 5 नंतर काढले गेले आहे, त्यामुळे या फोटो साठी माझी Shutter Speed 1/25 ठेवली होती. ज्यानेकारून Motion blur हा जास्तीत जास्त मिळावा. ISO हि नेहमी प्रमाणे 100 ठेवली. आता राहिले फक्त Aperture exposer नुसार F5 ठेवले होते,ज्याचा फायदा असा झाला कि मी जरी रस्ताच्या त्याबाजूने जाणाऱ्या गाड्याचा फोटो घेत होतो. पण या बाजूने जाणाऱ्या गाड्या या पूर्ण पणे Blur होत होत्या.


                Motion blur



               Nashik Che Photo Vede

       Shutter Speed, Aperture, ISO या तीन महत्वच्या Setting झाल्या नंतर आपण काही ईतर Setting करणे गरजेचे आहे. सर्व प्रथम सर्व Focuse Point Active करणे व कॅमेरा हा AF-C किवा Canon मध्ये Servo mode वर टाकणे ज्यामुळे Subject Frame कुठेही असला तरी Focuse मध्ये राहील. व AF-C किवा Servo mode मुळे Subject हा सतत हलत असला तरी Focuse मध्ये राहतो. ज्यामुळे Subject blur होत नाही. आता आपण सर्व प्रथम हे फोटो अश्या ठिकाणी काढण्याचा पर्यन्त करायचा जेथे Subject च्या मगील background हे जास्तीत जास्त Color Full असेल ज्यामुळे Motion blur दिसते व त्यावर subject हा उठून दिसतो. 

     सर्व setting झाल्या नंतर फोटो काढायला उभे राहताना दोन्ही पाया मध्ये थोडे आंतर ठेऊन व कंबरेतून थोडे वाकून उभे राहवे. कारण जेव्हा आपण आपला कॅमेरा हा Pan करतो म्हणजेच Subject जर डावीकडून उजवीकडे जात असेल तर आपण कॅमेरा देखील Subject सोबत फिरवत असतो. कंबरेतून वाकेल असल्यामुळे आपण कॅमेरासाठी Tripod चे काम करतो व ज्यामुळे आपल्यला कॅमेरा फिरवायला सोपे जाते व Shutter Speed कमी असून देखील Image शार्प येते. या ठिकाणी फ्रेम मध्ये Subject आल्या नंतर आपण फक्त Focuse करायचा Subject सोबत कॅमेरा Pan करायला सुरवात करायची व Shutter Button थोड्या पुढे आल्यावर दाबायचे आणि Shutter Button दाबल्यानंतर देखील Subject सोबत कॅमेरा फिरवत राहीचा. ज्यामुळे Motion blur चागले येते. Shutter Sutton दाबल्यानंतर लगेच कॅमेरा बाजुला केला तर फोटो खराब होऊ शकतो.


      वरील फोटोमध्ये बगीतले तर गाडीचा रंग, बुटाचा रंग, स्वेटर वरील पांढरा पट्टा हे सर्व व Motion मधील background समोर उठून दिसत आहे. हे फोटो काढताना आपले खूप सारे फोटो चुकतील परंतु या photography मध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. त्याशिवाय फोटोग्राफर होऊच शकत नाही, असे माझे मत आहे. या पद्धतीचा वापर करून आपण Car फोटोग्राफी किवा Bike Race चे खूप चागले फोटो काढू शकतो. व हे नक्कीच त्याठिकाणी ईतरापेक्षा वेगळे असतील. ज्याचा आपल्यला फायदाच होईल. 

१) आता ज्यांना कॅमेराचे setting किवा मनुअल mode माहित नाही त्यांनी सरळ कॅमेरा हा Shutter Priority Mode वर टाकून shutter speed हि सेट करावी. ईतर setting कॅमेरा स्वताः कातून घेतो. त्याचा फायदा असा होतो कि आपण फोटो कडे जास्त लक्ष देऊ शकतो. कॅमेरा सोबत खेळण्याचे काम नाही.

२) हे फोटो काढताना आपण रस्तावर उभे आहोत यांचे भान असू द्यावे. 

३) कॅमेरा Pan करताना कमीत कमी 45degree ची Panning Movement ठेवावी.

४) Wide Angle Lens वापून फोटो घेतल्याने नंतर तुम्ही हवा तसा Crop करू शकतात.



अधिक माहिती साठी संपर्क साधा.
Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com
Instagram:- https://www.instagram.com/pixel_movement/